🕒 1 min read
पुणे- राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय येत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च रोजी नियोजित असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आली आहे.
आयोगाने त्या संबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे.आयोगाने दिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच वेगवेगळ्या जिल्हयांनी निर्बंध लावलेले आहेत. प्रस्तुत परीक्षेची सुधारित तारीख जाहिर करण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान,महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत.राज्यसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ते करत असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेवून पुण्यातील नवी पेठेत ठिय्या मांडला आहे.
ग्रामीण भागातून पुण्यात अभ्यास करण्यासाठी आलेले हजारो विद्यार्थी आज पुण्यात आक्रोश व्यक्त करत आहेत.यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे.सरकार वय वाढवून देत आहे मात्र महिनाभराचा खर्च जवळपास १० हजार रुपये असल्याने तो कसा करायचा असा देखील प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर आहे.सरकारच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्याच्या समोर अंधार दाटला आहे.
दुसरीकडे या निर्णयानंतर कॉंग्रेसने लक्ष्यवेधी भूमिका घेत ठाकरे सरकारच्या डोकेदुखीत वाढ केली आहे. कॉंग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हणाले आहे. ते म्हणाले कि,’ एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे.’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.
राज्यात अधिवेशन, आरोग्य विभागाची भरती आणि मोठमोठे लग्नसमारंभ पार पडतात. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात काय अर्थ आहे, असा सवाल विचारत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिला.विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस अभ्यास करायचा. राज्यात अधिवेशन आणि लग्नसमारंभ पार पडतात. मग एकट्या विद्यार्थ्यांनाच शिक्षा देणे योग्य नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले,एक वेळ उपाशी पोटी राहून,घाम गाळून मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणाऱ्या आई वडिलांचा विचार करून लवकर परीक्षा व्हावी ही सरकारची भूमिका आहे. विरोधी पक्षाने सामंजस्याची भूमिका घेऊन या संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकारसोबत चर्चा करावी.
महत्त्वाच्या बातम्या
- सरकारने MPSCच्या विद्यार्थ्यांचं वाटोळंच करायचं ठरवलंय : राम सातपुते
- परभणीमध्ये कुऱ्हाडीने मारहाण करून पायाची बोटे तोडली
- MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी : पंकजा मुंडे
- जायकवाडीची पाणीपट्टी थकवणाऱ्या औरंगाबाद ‘मनपा’वर कारवाई करणार कोण?
- विनामास्क फिरणार्याकडून महापालिकेच्या कर्मचार्यास मारहाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
