Share

‘आम्हाला मदत करा…आमच्या देशातील जनतेला लसीची खूप गरज आहे’; ‘या’ देशाच्या पंतप्रधानांचे मोदींना पत्र

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सद्भावाचे आणखी एक उदाहरण घालून देत शेजार धर्माचे पालन केले आहे. भारताने नुकतीच भूतान आणि मालदीव या आपल्या शेजारील देशांना भेट म्हणून कोरोना लसींचा पुरवठा केला आहे. विविध देशांना कोरोना लसींचा पुरवठा बुधवारपासून सुरू झाला असून, तो यापुढील काळातही सुरू राहील, असे मोदी यांनी सांगितले.

दरम्यान, भारताकडे मदत मागणाऱ्या या देशांच्या यादीमध्ये आता डोमिनिकन रिपब्लिकच्या नावाचाही समावेश झाला आहे. डोमिनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान रूझवेल्ट स्कॅरिट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. तसेच भारताने कोरोना लसीचे 70 हजार डोस मदत म्हणून पाठवावेत अशी मागणी केली आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार डोमिनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान स्कॅरिट यांनी पत्रात ‘जगाने 2021 मध्ये प्रवेश केल्यानंतरही आपल्या सर्वांची कोविड-19 विरोधातील लढाई सुरू आहे. डोमिनिकनमधील 72 हजार लोकसंख्येला कोरोना लसीची खूप गरज आहे. यासाठी मी तुमच्याकडे विनंती करतो की, आमच्या देशातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या गरजेनुसार कोरोना लसीचे डोस मदत म्हणून पाठवून आम्हाला सहकार्य करावे’असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!