🕒 1 min read
कोल्हापूर:- नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. या निवडणुकांमध्ये भाजपला गेली अनेक दशकं वर्चस्व असलेला नागपूर मतदारसंघ गमवावा लागला. तर, पुण्याचा बालेकिल्ला देखील भाजपच्या हातून निसटला. यासह इतर जागांवर देखील भाजपला पराभव स्वीकारत केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे.
शुक्रवारी (8 जानेवारी) महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनंगटीवार हे तीन बडे नेते दिल्लीत दाखल झाले होते. या तिन्ही नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. यावेळी भाजपच्या दिल्लीतील या बैठकीत स्थानिक निवडणुकांमध्ये पराभव आणि आगामी निवडणुकांवर बैठक आयोजित केली होती.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था डोना़ल्ड ट्रम्प यांच्यासारखी झाली आहे. त्यांना पराभवाची कारणमीमांसा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा समोर करताना नाकी नऊ आले असतील, अशी खोचक टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच ज्या ठिकाणी बॅलेटवर निवडणुका झाल्या आहेत. तिथेही भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे, असेही सचिन सावंत कोल्हापुरात माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा निर्णय
- अनेकदा ऑस्ट्रेलिया चाहत्यांकडून रंगावरून टिप्पणी होते; वर्णद्वेषीच्या टीकेवरून क्रिकेटपटू भडकले
- आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्यात पोहोचले, पण…
- #भंडारा जिल्हा रूग्णालयातील हलगर्जीपणाची चौकशी करुन दोषींवर तात्काळ कारवाई करा- दरेकर
- भंडारा घटनेतील सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये जुळ्यांचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
