Share

Breaking News | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उद्या अचानक दिल्ली दौऱ्यावर, राजकीय घडामोडींना वेग

Published On: 

🕒 1 min read

Breaking News | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातच भर म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून अस्थिरता निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सीमावादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. शिंदे आणि फडणवीस हे उद्या दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची ठरणार आहे.  दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काल गुजरातला गेले होते.

या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित होते. या दरम्यान अहमादाबाद विमानतळातील विशेष कक्षात शिंदे-फडणवीस आणि बोम्मई यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली होती. पण नेमकी काय चर्चा झाली, याबाबत माहिती समोर आली नव्हती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!