Share

Nitesh Rane | “मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, जर कोणी…” ; नितेश राणे यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

Nitesh Rane | सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या विधानाच्या निषेधार्थ अनेक संघटना आणि विरोधी पक्षांनी मंगळवारी पुण्यात बंदची हाक दिली. यावेळी छत्रपती उदयनराजे यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली तसेच राज्यपालांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी साताऱ्यात आपली भूमिका स्पष्ट केली.

“मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. जर कोणी महाराजांबद्दल बोलले तर राज्यात कोणीही सहन करणार नाही. आम्हाला कोणाच्या पाठीशी राहायची गरज नाही. ज्याला इतिहास माहिती नाही त्यांनी बोलू नये. संजय राऊतांनी छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागितले मग त्यांना का विचारले नाही. आम्ही जर तोंड उघडलं तर महाराष्ट्रभर फिरू देणार नाही”, असा इशारा राणे यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीला दिला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यात आता भाजप आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचीही भर पडली आहे. सरपंच निवडणुकीत आपल्या आवडत्या उमेदवाराला विजयी करा, अशी थेट धमकी नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना दिली होती. त्यावर देखील नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नितेश राणे म्हणाले, “मी 2014 पासून दोनदा माझ्या मतदारसंघांमध्ये निवडून आलो आहे. माझ्या जनतेला मी अधिकारवाणीने बोलू शकतो. तसे माझं त्यांच्याशी नाते आहे. माझ्या विरोधकांना ती धमकी वाटली गेली. कारण त्यांना राणेंची ऍलर्जी आहे. माझ्या लोकांना माझ्या बोलण्याची पद्धत आवडते म्हणून मला त्यांनी निवडून दिले.”

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!