🕒 1 min read
Nilesh Rane | मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं निश्चित झालं आहे. यंदा भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय नोंदवला आहे. देशभरातून राजकीय मंडळी यावर प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रातील निवडणुका होऊन जाऊन द्या असे विधान केले होते. त्यालाच उत्तर देताना आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
“अरे चम्या तुझं कोण कुत्र तरी ऐकतो का?”, अशा शब्दांत निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. रोज उठून तू बेअक्कल आहेस ते दाखवू नको, जर तुला खरंच वाटत असेल निवडणुका व्हाव्यात तर जा कोर्टात आणि बघ कोर्टातून काय उत्तर येतं, असंही निलेश राणे म्हणालेत.
अरे चम्या तुझं कोण कुत्र तरी ऐकतो का?? रोज उठून तू बेअक्कल आहेस ते दाखवू नको, जर तुला खरंच वाटत असेल निवडणुका व्हाव्यात तर जा कोर्टात आणि बघ कोर्टातून काय उत्तर येतं. pic.twitter.com/JV3PcRIfMa
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 9, 2022
आदित्य ठाकरेंचं वक्तव्य काय?
“गुजरात, हिमाचल मधील विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. आतातरी महाराष्ट्राच्या निवडणुका लावाव्यात. मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका बाकी आहेत. तसेच, महाराष्ट्रातही आता लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन द्या. असे अदित्य ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Gajanan Kale | “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर…”; राऊतांचा उल्लेख करत मनसेचा ठाकरे गटावर हल्लाबोल
- Katrina Kaif & Vicky Koushal | विकी-कॅटच्या लग्नात का होते मर्यादित लोकं?, कतरिनाने दिले उत्तर म्हणाली…
- Sushma Andhare | “मुलाने हजार कोटीचा आणलेला निधी कुठे गेला?”; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना परखड सवाल
- Sushma Andhare | आज ही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी बाळासाहेबांचे नाव वापरावं लागत – सुषमा अंधारे
- Amol Mitkari | “…त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत”; अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
