Amol Mitkari | सोलापूर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. याच पार्वश्वभूमीवर राष्टवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खोचक टोला लगावला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना अजूनही माहिती नाही की आपण मुख्यमंत्री आहोत. समृद्धी महामार्गाच्या पाहणी वेळेस स्टेरिंग फडणवीसांच्या हातात होत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.” देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळी मुख्यमंत्री पदावर होते, त्या त्या वेळी राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं होतं अशी टीकाही अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलीय.
आत्महत्या वाढल्यायाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस कडून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मिळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र राज्य सरकारचं शेतकऱ्यांच्या कोणत्याही अडचणींकडे लक्ष नसल्याचा आरोप अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलाय.
पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्र – बेळगाव एकीकरण समितीबद्दल कोणाचं ही दुमत नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जाणीवपूर्वक सीमावादाचा प्रश्न उकरून काढला.” गोध्रा हत्याकांड आणि महाराष्ट्रातले उद्योग पळवल्यामुळे जसा गुजरातला फायदा झाला तसा फायदा मराठी माणसांवर हल्ले करून कर्नाटक मोहिमेमध्ये फायदा होईल असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. पण बसवराज बोम्मईने लक्षात घ्यावं अक्कलकोट, जत, सांगोला भागातील गाव ही महाराष्ट्रातच राहणार. कारण हा महाराष्ट्र जगला तर देश जगेल, असंही मिटकरी म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs BAN | तिसऱ्या वनडेसाठी के. एल. राहुल करणार टीम इंडियाचे नेतृत्व, तर ‘हे’ गोलंदाज संघातून बाहेर
- Uddhav Thackeray | “मोदी हे गुजरातचे गौरव पुरुष”; ठाकरे गटाकडून कौतुकाचा वर्षाव
- Body Pain In Winter | हिवाळ्यामध्ये अंगदुखीच्या त्रासापासून मुक्त व्हायचे असेल?, तर करा ‘या’ गोष्टी
- IPL 2023 | आयपीएल 2023 साठी नवीन अपडेट जारी, जाणून घ्या काय आहे?
- Sanjay Gaikwad | “त्या खेकड्याला कोण मारणार?”; संजय गायकवाड यांची संजय राऊतांवर टीका


