Share

Rohit Pawar on Gujarat Result | “मोठ्या मनाने स्वतःचे प्रकल्प गुजरातला…” ; गुजरात निकालांवर रोहित पवारांची प्रतिक्रिया!

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar on Gujarat Result | मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निकालांमध्ये भाजपने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. भाजप 156, काँग्रेस 17, आप 5 आणि इतर 4 जांगावर आघाडीवर आहेत. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे.  हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस 39 तर भाजप 26 जागांवर आघाडीवर आहेत. या सर्व निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

“महाराष्ट्राच्या युवकांच्या नोकरीच्या स्वप्नांना चुरगळून तेच स्वप्न गुजरातच्या युवांना दाखवत स्वतःचे सत्तेचे स्वप्न साकारणाऱ्या भाजपाचं ‘हार्दिक’ अभिनंदन तर हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला नमवत विजयी झालेल्या काँग्रेस आणि आपचंही मनःपूर्वक अभिनंदन!,” असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, “गुजरातचा निकाल म्हणजे पंतप्रधान साहेबांच्या 31 व गृहमंत्र्यांच्या 38 सभा तर डझनभर केंद्रीय मंत्री व अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तळ ठोकून केलेल्या प्रचाराचं फलित आहे. शिवाय मोठ्या मनाने स्वतःचे प्रकल्प गुजरातला देऊन शेजारधर्म निभावणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे योगदान विसरता येणार नाही.”

गुजरातमध्ये 182 विधानसभा जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. गुजरातमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पक्षाच्या (आप) जोरदार उपस्थितीमुळे यावेळी निवडणूक लढत तिरंगी झाली.

गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. 2002 च्या निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये 127 जागा जिंकल्या होत्या. दरम्यान हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. 2002 मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

2017 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर एकूण 182 जागांपैकी भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरातमध्ये आतापर्यंत भाजपने 2002 मध्ये सर्वाधिक 127 जागा जिंकल्या होत्या. आता भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो असा दावा केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!