Gujrat Election Result | अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जसजसा हाती येत आहे त्यातून हे स्पष्ट झालं आहे कि भाजपने या वेळीही बाजी मारलेली आहे. अशातच आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतची माहितीही समोर आली आहे. भाजपने याबाबतची घोषणा केली आहे.
गुजरातचे वर्तमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी सांगितलं आहे. गांधीनगर येथे १२ डिसेंबर रोजी विधानसभेच्या मागे असलेल्या मैदानात शपथविधी होणार आहे. या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहांसह अनेक नेते सहभागी होणार आहेत.
आत्तापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुासर, गुजरातमधील 182 जागांपैकी 157 जागांवर भाजप पुढे आहे. 84 जागा भाजपने जिंकल्या आहेत. 16 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर, आप ५ जागांवर आघाडीवर आहे. भाजपला गुजरात निवडणुकीत विक्रमी विजय मिळाला असल्याचं चित्र आहे.
घाटलोडियामधून पटेल यांनी काँग्रेसच्या अमेय याज्ञिक यांचा सुमारे २ लाख मतांनी पराभव केला. 2017 मध्ये त्यांनी 1.17 लाख मतांनी ही जागा जिंकली. सप्टेंबर २०२१ मध्ये मुख्यमंत्री होण्यापूर्वी भूपेंद्र पटेल अहमदाबादबाहेर आणि पक्षाच्या वर्तुळातही फारसा ओळखीचा चेहरा नसलेले भूपेंद्र यादव यांनी बाजी मारत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Grapes Benefits | हिवाळ्यात द्राक्षे खाल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- Sharad Pawar | “…मग एकतर्फी निकाल लागणारच”; गुजरात निकालावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य
- Gujarat Election Results 2022 | पूल कोसळून १३४ जणांचा बळी गेलेल्या मोरबीमध्ये भाजप उमेदवार विजयी!
- World Test Championship | काय करणार BCCI?, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आयपीएल 2023 फायनल एकाच वेळी
- Sanjay Raut | “शिवाजी महाराज यांचा अपमान जनतेने विसरायला हवा, म्हणून भाजपाने…”; संजय राऊतांचा आरोप काय?


