Share

Sambhajiraje Bhosale | “… नाहीतर मला कर्नाटकात यावे लागेल”, संभाजीराजे भोसले यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

Sambhajiraje Bhosale | मुंबई : कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. अशातच भाजप (BJP) नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) यांनी देखील कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत,त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल, असं देखील ते म्हणाले.

जर कोणी गुंडाने महाराष्ट्राशी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हे कर्नाटकने लक्षात ठेवावे आणि आणि अशा लोकांना आम्ही नक्कीच धडा शिकवू शकतो, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

तसेच, महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आल्यानंतर कर्नाटक सरकारने अशा गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी आणि जे जाळपोळ करतात, त्यांना तुरुंगात टाकावे, असं देखील मुनगंटीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!