Share

PAK vs ENG | इंग्लंडला मोठा झटका! लियाम लिव्हिंगस्टन पाकिस्तान दौऱ्यातून बाहेर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pak vs ENG) यांच्यामध्ये कसोटी सामना खेळला जात आहे. टी-20 विश्वचषकानंतर कसोटी सामन्यांमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. या कसोटी सामन्यातून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टन (Liam Livingston) गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटी दरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आता ही मालिका पुढे खेळू शकणार नाही.

इंग्लंड संघातील अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टन याला रावळपिंडी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सीमेवर क्षेत्ररक्षण करताना उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर पाकिस्तानच्या पहिल्या डावामध्ये तो मैदानाबाहेर होता. दुसऱ्या डावामध्ये तो फलंदाजीसाठी उतरला असताना त्याला धावा काढण्यामध्ये अडचणी आल्याचे दिसून येत होते. त्याने या कसोटीच्या पहिल्या डावात नऊ आणि दुसऱ्या सामन्यात सात धावा केल्या. तर त्याला या मालिकेमध्ये एकही सामन्यात गोलंदाजी करता आली नाही.

लियाम लिव्हिंगस्टन याला झालेल्या दुखापतीचे चौथ्या दिवशी गांभीर्य स्पष्ट झाले. उद्या म्हणजेच मंगळवारी तो युकेला परत जाणार आहे. युकेला परतल्यावर ईसीबी आणि लॅकेशयार वैद्यकीय संघाच्या देखरेखीखाली तो पुनर्वसनासाठी राहील.

इंग्लंड संघातील अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टन गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. दरम्यान, त्याच्या जागी कोणता खेळाडू संघात त्याची जागा घेईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. लियाम लिव्हिंगस्टन लेग स्पिन आणि ऑफ स्पिन दोन्ही प्रकारच्या गोलंदाजी करतो. त्यामुळे आता त्याच्या जागी संघात कोणाचा समावेश करावा हा इंग्लंड संघासमोर मोठा प्रश्न आहे.

अशा परिस्थितीत लियाम लिव्हिंगस्टनच्या जागी मार्क वूडचा संघामध्ये समावेश केला जाऊ शकतो. पाकिस्तानविरुद्ध दुसरी कसोटी शुक्रवारपासून मुलतानमध्ये सुरू होत आहे. तिथली खेळपट्टी पहिल्या कसोटी प्रमाणेच सपाट राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघ कुणाला लिव्हिंगस्टनच्या जागी संघात सामील करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!