Share

Amol Mitkari | “भाजपाने नाक रगडून…”; प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी संतापले

Published On: 

🕒 1 min read

Amol Mitkari | मुंबई : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचं वक्तव्य प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपावर टीका केली आहे.

“सकाळ झाली भाजपाचे लोक एक बेताल व्यक्तव्य करत आहेत. प्रसाद लाड यांनी नवा जावई शोध लावला आहे. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्यावर झाला. शिवरायांची राजधानी रायगड होती, असे आम्ही वाचत आलो आहोत. मात्र लाड म्हणत आहेत की शिवरायांचा जन्म कोकणात झाला. विशेष म्हणजे ते स्क्रीप्ट वाचून असे सांगत आहेत”, असा आरोप करत अमोल मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे.

“उद्या गुजरात महोत्सव घ्यायचा असेल तर गुजरातच्या लोकांना खुश करण्यासाठी ते शिवरायांचा जन्म गुजरातच्या सुरतमध्ये झाला, असे म्हणतील”, अशी टीकाही मिटकरींनी केली आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूक समर्थन कारणीभू असल्याचं मिटकरी म्हणालेत. यांना पळता भुई थोडी होईल. यांनी आता फक्त माफी मगू नये तर नाग रगडून प्रायश्चित्त करावे, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणालेत प्रसाद लाड?

“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं प्रसाद लाड म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!