Share

Prasad Lad | “शिवरायांचा जन्म कोकणात झाला”; भाजपच्या आणखी एका नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Published On: 

Prasad Lad | मुंबई : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर पर्यटनमंत्री तथा भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेशी केली. हे वाद मिटत नाहीत तोवरच भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचं विधान प्रसाद लाड यांनी केलं आहे. “हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं प्रसाद लाड म्हणालेत.

राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅन्डलवरून प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. प्रसाद लाड यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी, अशी मागणी होत आहे. लाड यांच्या विधानाचे पडसाद उमटत असून  राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

‘भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे,’ असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!