Share

Sushma Andhare | “मी माझा भावाच्या भेटीला आली”, सुषमा अंधारे यांची शिंदे गटातील ‘या’ नेत्यावर टीका

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare | मुंबई :  नरेंद्र भोंडेकर (Narendra Bondekar) यांनी सुषमा अंधारे यांना भंडाऱ्यातून निवडणूक लढण्याचे आवाहन केले होते. तसेच, सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना फुटणार असल्याचा दावा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला होता. या सर्वांवर सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभे बद्दल सुद्धा विचारण्यात आलं होतं.

मी माझा भाऊ नरेंद्र भोंडेकर यांच्या भेटीला आली, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी भोंडेकरांवर पलटवार करताना दिली आहे. आम्ही सुद्धा आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी आलेलो आहोत. शिवसेना थकलेली नाही. नव्या उमेदीने लढणार हे दाखविण्यासाठी मी आलेली आहे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. चार-दोन आमदार हलले म्हणजे शिवसेना संपली असे होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

यादरम्यान, शिवसेनेचे मुख्य बेस हे त्यांचे वोटर आहेत. ते अजूनही शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले आहे. त्यांना नवीन ताकद आणि उमेद देण्याकरिता आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.

प्रकाश महाजनांनी पेढे वाटावे असा सल्ला त्यांनी महाजन यांना दिला आहे. महाजन कुटुंब पर्यायाने भाजप शिवसेना संपविण्यासाठी करत असलेले प्रयत्न त्यातून हे वाक्य आहे, असं सुषमा अंधारे यांनी प्रकाश महाजन यांच्यावर पलटवार केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!