🕒 1 min read
अहमदाबाद : आज विजय हजारे ट्रॉफी 2022 (Vijay Hazare Trophy 2022) स्पर्धेचा अंतिम सामना रंगला आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे हा सामना खेळला जात आहे. या सामन्यामध्ये महाराष्ट्र आणि सौराष्ट्र हे दोन्ही संघ विजेते पदासाठी लढत आहे. या सामन्यामध्ये सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकर (Jaydev Unadakar) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या महाराष्ट्राच्या कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) ने शानदार शतक झळकावले आहे. ऋतुराजच्या या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने सौराष्ट्र संघाला 249 धावांची लक्ष दिले आहे.
विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) अंतिम फेरीमध्ये ऋतुराजचे शानदार शतक
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या महाराष्ट्र संघाच्या कर्णधार ऋतुराज गायकवाडने 131 चेंडूमध्ये 108 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 7 चौकार लगावले आहे. ऋतुराजच्या या खेळीनंतर महाराष्ट्र संघाने 9 बाद 248 धावा केल्या. त्याचबरोबर अझीम काझीने 33 चेंडूमध्ये 37 धावा केल्या. तर महाराष्ट्राचे हे दोन खेळाडू सोडले तर बाकी खेळाडू काही चांगली कामगिरी करू शकले नाही.
तर, या सामन्यांमध्ये सौराष्ट्र संघाकडून गोलंदाजी करत असताना कुशाल पटेलने सर्वाधिक गडी बाद केले. त्याने या सामन्यात 43 धावा देत 3 गडी बाद केले. त्याचबरोबर कर्णधार जयदेव उनाडकर, पार्थ भूत आणि प्रेरक मंडक यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.
ऋतुराज गायकवाडची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कारण विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराजने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने उपांत्य फेरीपूर्वी उत्तर प्रदेशविरुद्ध आणि उपांत्य फेरीमध्ये शतक झळकावले आहे. या स्पर्धेमध्ये ऋतुराज महाराष्ट्रासाठी सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नव्हता. पण संघामध्ये आल्यानंतर ऋतुराज ने विरोधी संघाला चांगलीच धूळ चारली आहे. ऋतुराजने चार सामन्यांमध्ये तब्बल 552 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Freddy | ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर बघता येईल कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’
- Eknath Shinde | “शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी…”; शिंदे गटाची काव्यमय टीका
- Sushma Andhare | महाराष्ट्रात पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असणार? सुषमा अंधारे म्हणाल्या…
- Sushma Andhare | “ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे”; सुषमा अंधारेंचा निशाणा कुणावर?
- Gold Mines | सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कशी सापडली सोन्याची खाण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
