Share

Freddy | ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर बघता येईल कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या त्याच्या फ्रेडी (Freddy) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक एका सायको डेंटिस्टची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी फ्रेडी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरला भरपूर प्रशंसा मिळाली होती. तर आज हा चित्रपट ओटीटीवर (OTT) वर प्रदर्शित होणार आहे. ट्विस्ट आणि टर्न भरलेल्या या चित्रपटाचा आनंद तुम्ही घर बसल्या घेऊ शकता.

कार्तिक आर्यनच्या फ्रेडी चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहे. हा चित्रपट चित्रपटगृह सोडून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज 2 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची कथा खूप रंजक आहे. या चित्रपटांमध्ये तुम्हाला थ्रील आणि ट्विस्ट बघायला मिळतील. ट्रेलर मधील कार्तिकचा लुक बघून चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता लागली होती.

फ्रेडी हा कार्तिक आर्यनचा सायको थ्रिलर चित्रपट तुम्ही ओटीपी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) वर बघू शकतात. सबस्क्रिप्शननुसार प्रेक्षक लॅपटॉप किंवा मोबाईल त्याचबरोबर टीव्हीवर देखील या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

कार्तिक आर्यन फ्रेडी या चित्रपटांमध्ये डॉ. फ्रेडी जिनवाला या डेंटिस्टची भूमिका सकारात आहे. डॉ. फ्रेडीचे आयुष्य क्लिनिक आणि त्याच्या घराभोवतीच फिरत असते. फ्रेडी हा एकटा आणि सायको माणूस आहे. जो दिवसांमध्ये मध्यमवर्गीय माणसाचे जीवन जगतो आणि रात्री सायको किलर बनवून लोकांना मारतो. प्रेम आणि उत्कटता असलेल्या या चित्रपटाच्या प्रोमो आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

शशांक घोष दिग्दर्शक चित्रपट फ्रेडी मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. तर, आलिया एफ त्याच्यासोबत या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!