🕒 1 min read
Eknath Shinde | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जातीय राजकारण करण्याचा आरोप केला. शरद पवार स्वत:हून कधीही शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे नाहीत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “शरद पवारांना महाराष्ट्र ५५ वर्ष ओळखतोय. ५५ वर्ष शरद पवार राजकारण करत आहेत. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलंय.” वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. त्यात नखभरही तथ्य नाही, असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं.
यासंदर्भात राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिल्यानंतर आता शिंदे गटाकडून शरद पवार आणि ठाकरे गटाला खोचक टोला लागवण्यात आला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी एक कविता त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच ठाकरे गट, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही..यात शिवरायांचा अपमान नाही? भ्रष्टवादींच्या गजभियेंना महाराज बनून ऐऱ्या-गैऱ्याला मुजरा घालताना शरम वाटत नाही? यात शिवरायांचा अपमान नाही? येता जाता शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी एकदाही एखादा गड चढला नाही यात शिवरायांचा अपमान नाही?” असा सवाल कवितेच्या माध्यमातून नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.
यात शिवरायांचा अपमान नाही?
शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही..
यात शिवरायांचा अपमान नाही?भ्रष्टवादींच्या गजभियेना महाराज बनून ऐऱ्या गैऱ्याला मुजरा घालताना शरम वाटत नाही?
यात शिवरायांचा अपमान नाही?@OfficeofUT @NCPspeaks @INCMaharashtra— Naresh Mhaske (@nareshmhaske) December 2, 2022
“शाहिस्त्याची बोटं छाटतानाच्या देखाव्यात कार्यकर्ते शिवरायांना शरदमुखचंद्र चिकटवतात. भ्रष्टवादीच्या ऑफिशियल अकाउंट वरून ट्वीट करतात..यात शिवरायांचा अपमान नाही?” असंही या ट्वीटमध्ये म्हंटल आहे.
दरम्यान, या ट्वीट्समधून संजय राऊतांनाही म्हस्केंनी टोला लगावला आहे. “उद्धव ठाकरेंचा एक पोपट राऊत..दम तर तसा काहीच नाही भाऊत. पण मागतो पुरावे शिवरायांच्या वंशजांना..सिद्ध करा म्हणतो तुमच्या रक्तातल्या शिवाजींना..यात शिवरायांचा अपमान नाही? औरंग्याच्या कबरीवर वाहिली फुले, कबरीला त्या नराधमाच्या संरक्षण दिले..यात शिवरायांचा अपमान नाही?”, असाही सवाल म्हस्केंनी केला आहे. शरद पवार आणि संजय राऊत यांच्याप्रमाणेच नरेश म्हस्केंनी सुषमा अंधारेंचाही या कवितेमध्ये उल्लेख केला आहे.
अंधारे बाई तर कहरच करतात
निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या रौताला गुन्ह्यात अटक झाल्यावर
त्याच्या आईची तुलना
जिजाऊशी करतात
यात शिवरायांचा अपमान नाही?हजारो हिंदू यमसदनी धाडले त्याच टिपू सुलतानाचे नाव यांनी पालिकेच्या मैदानाला दिले
यात शिवरायांचा अपमान नाही?@DrSEShinde— Naresh Mhaske (@nareshmhaske) December 2, 2022
“अंधारे बाई तर कहरच करतात..निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या रौताला गुन्ह्यात अटक झाल्यावर त्याच्या आईची तुलना जिजाऊशी करतात..यात शिवरायांचा अपमान नाही?” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | महाराष्ट्रात पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असणार? सुषमा अंधारे म्हणाल्या…
- Sushma Andhare | “ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे”; सुषमा अंधारेंचा निशाणा कुणावर?
- Gold Mines | सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कशी सापडली सोन्याची खाण!
- Prakash Mahajan | “सुषमा अंधारे यांच्या मेंदूला नारू झालाय काय?”; प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
- Vijay Hazare Trophy 2022 | आज रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना, ऋतुराज आणि जयदेवच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
