Share

Deepak Kesarkar | “कुणीही उठायचं आणि मुख्यमंत्र्यांवर घसरायचं…”, दीपक केसरकर संतापले

Published On: 

🕒 1 min read

Deepak Kesarkar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवनेरीवर येऊ दिले जाणार नाही, असा इशारा दिला होता. यावरुन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अर्थात शिंदे गटातील नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी संताप व्यक्त केला आहे.

पुण्यातील शिरूर येथे दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, छत्रपतींचा वारंवार होणार अवमान आम्ही सहन करणार नाहीत, असंही ते म्हणाले होते. मात्र दीपक केसरकर यांनी कोल्हे यांना प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपतींबद्दल काहीच वादग्रस्त बोलले नाहीत, असं केसरकर म्हणाले.

यादरम्यान, एवढे दिवस बाळासाहेबांच्या विचारांवर चालले नाहीत आणि आता त्यांना अनेक विचारांची गरज भासत आहे, राज्यभर दौरे करणाऱ्या आदित्य आणि उद्धव ठाकरेंचा दीपक केसरकर यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, अडीच वर्ष भेट मिळत नव्हती आता खोके खोके करत राज्यभर फिरत असतात काही गोष्टी ठरवून करण्यात आदित्य ठाकरेच आघाडीवर आहेत, असा टोला देखील केसरकरांनी लगावला आहे.

दरम्यान, फक्त हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या मात्र कृतीतून वेगळंच करायचं अशा शब्दात केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. राज्यपालांकडून छत्रपतींबद्दल विधान निघाले असेल… मात्र राज्यपाल हे भाजपाचे नेते नाहीत, तर ते घटनात्मक पदाचे प्रमुख आहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे छत्रपतींचा अपमान महाराष्ट्रात सहन करणार नाही, असं केसरकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!