🕒 1 min read
Mangalprabhat Lodha | मुंबई : शिवप्रताप दिन निमीत्त प्रतापरगडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी बोलताना मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी केली होती. यानंतर अनेक नेत्यांनी टीका केली. त्यावर आता मंत्री लोढा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
याबाबत स्पष्टीकरण देत असताना, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. तर जो प्रसंग घडला याची तुलना केली. केवळ त्या प्रसंगातील साधर्म्य दाखवण्याचा माझा प्रयत्न होता, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अजित पवार, अमोल कोल्हे, आदित्य ठाकरे, अमोल मिटकरी यांनी मंगल प्रभात लोढा यांच्या विधानाचा तीव्र निषेध केलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीची तुलना शिवरायांच्या प्रतापाशी होऊ शकत नाही, असा या नेत्यांचा एकसूर पाहायला मिळतोय.
औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कुणीतरी डांबून ठेवलं होतं पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं लोढा म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | लोढांकडून शिवरायांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंशी, आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
- Eknath Shinde | “शेतकरी हेलिकॉप्टरने शेती करायला जाऊ शकत नाही का?”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
- Aditya Thackeray | “मिंधेगटाच्या गद्दारीची तुलना शिवरायांच्या पराक्रमाशी होऊच शकत नाही”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
- Eknath Shinde | “ज्यांच्याकडे काही काम नाही ते…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा कुणावर?
- Mangal Prabhat Lodha | शिवरायांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंशी, भाजप मंत्र्याचे प्रतापगडावर वादग्रस्त विधान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
