🕒 1 min read
Aravind Sawant | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजारपणावरून त्यांची मिमिक्री केली होती. ‘मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते’, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होत. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Aravind Sawant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ते म्हणाले, “ज्या डॉक्टरांनी उद्धव ठाकरेंवर उपचार केले, कधी त्यांची मुलाखत घेऊन बघा. तेव्हा तुम्हाला कळेल, की उद्धव ठाकरे किती मोठ्या आजारातून बाहेर आले. इतक्या मोठ्या आजारावर मात करून ते आता बाहेर पडत आहेत. याचे त्यांना दुख आहे का? त्यामुळे राज ठाकरेंनी ज्याप्रकारे टीका केली ती त्यांना न शोभणारी आहे.”
“बाकीच्या राज्यांमध्ये जेव्हा नदीत मृतहेद तरंगत होती, तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला ऑक्सिजन कसा मिळेल, यावर उद्धव ठाकरे काम करत होते. त्यावेळी केंद्र सरकारही मदत करत नव्हते, अशा अनेक समस्यांवर मात करून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्राण वाचवले”, असं अरविंद सावंत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
“करोना काळात कमी वेळेत टास्क फोर्स, रुग्णालयं स्थापन करण्यात आली. त्याचे कौतुक सर्वोच्च न्यायालयासह जागतिक आरोप संघटनेनेही केले होते. या गोष्टींचा तुम्हाला अभिमान वाटायला नको का?”, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Winter Health Care | हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे सेवन
- Sanjay Raut | “राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, मिमिक्रीच पाहायची तर…”; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका
- Dry Skin Tips | हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपेपूर्वी लावा ‘या’ खास गोष्टी
- Sushma Andhare | “ईडीच्या नोटिशीनंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’चा ‘बंद रे व्हिडीओ’ का झाला?”; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोला
- Devendra Fadnavis | “उद्धव ठाकरेंनी मनाचीच नाही तर जनाची पण लाज बाळगावी” ; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
