🕒 1 min read
Bawankule on Ajit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसेभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) आल्यापासून म्हणावे तसे काम होताना दिसत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झालं आहे. सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड तणावाखाली काम करत आहे. आधीच्या सरकारच्या काळात व्हायच्या तशा बैठका देखील होत नाहीत, असे अजित पवार म्हणाले यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांनी पलटवार केला आहे. अजित पवार महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाहीत, अशी खोचक टीका बावनकुळेंनी केली.
“अजित पवार यांनी एवढ्या लहान विषयावर बोलू नये. त्यांना हे शोभत नाही. अडीच वर्षाच्या सरकारच्या काळात तुम्ही कमजोर होते. मुख्यमंत्री कमजोर होते. तुम्ही आकासाचं राजकाण केलं. सत्तेचा वापर केवळ आपला पक्ष वाढवण्याकरीता केला. गरज नसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा दिल्या. बलात्कार झाले, त्याचे समर्थन तुम्ही केले. विनयभंग झाले त्याचे समर्थन केले. तुमच्या समर्थनाचा रेकॉर्ड काढला तर तुम्ही या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही,” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) अस्वस्थतेमध्ये बोलत आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून सरकारवर आरोप करण्याकरीता केवळ केवीलवाणी धडपड आहे, असे मला वाटते. ज्या सरकारच्या बैठकी होत नव्हत्या. ज्या सरकारमध्ये फेसबुक लाईव्ह होत होते. ज्या सरकारमध्ये कॅबीनेटच्या बैठकी फेसबुकवर होत होत्या. अधिकाऱ्यांच्या बैठकी तर सोडाच. त्यामुळे या लोकांनी बैठकांवर बोलू नये. अडीच वर्षात जेवढे निर्णय घेतले नाहीत तेवढे तीन महिन्यात फडणवीस-शिंदे सरकारने घेतले.
बावनकुळे म्हणाले, आता आठरा अठरा तास काम करणारे करणारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे चांगले नेते महाराष्ट्राला मिळाले. या महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेला सुरक्षा कवच आहे. गुंडशाहीला लगाम लागला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
- Shivsena | मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली
- Anil Desai | “आठवणींबद्दलच बोलायचंय तर आमच्याकडे 2009 पूर्वीच्या…”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल देसाईंची टीका
- Urfi Javed | पाकिस्तानकडून कौतुक झाल्यावर उर्फी जावेद झाली अधिक सुसंस्कृत, पाहा व्हिडिओ
- Chandrashekhar Bawankule | “बैठकांवर अजित पवारांनी बोलू नये, त्यांना शोभत नाही” ; बावनकुळेंचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
