🕒 1 min read
Gulabrao Patil । जळगाव : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असे दोन गट शिवसेनेत तयार झाले. अजूनही या दोन गटांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरूच आहे. अशातच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना आमदारांना परत बोलवा असं सांगूनही त्यांनी २२ आमदारांचंही ऐकून घेतलं नाही. तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हीही जा म्हणाले. कोणीही का असेना, पण माणसाला राग येतो,” असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना खोचक टोला लगावला.
“मी तर ३३ व्या क्रमांकाला एकनाथ शिंदेंसोबत गेलो. माझ्या आधी तर खूप लोक गेले होते. आम्ही पहिल्यांदा २०-२२ आमदार उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की, आमदार वापीपर्यंत पोहचले आहेत, त्यांना परत बोलवा. ते सुरतमध्ये घुसले तर तुमची ‘सुरत’ (चेहरा) तुटल्याशिवाय राहत नाही. मात्र तरीही त्यांनी आमचं ऐकलं नाही”, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी त्यांनी त्यांच्या भाषाशैलीत तुफान फटकेबाजी केली. मी गावरान माणूस आहे, दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस आहे. मी द्वीअर्थी बोलणारच, असं मत गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं. तसेच मी मुकं मुकं बोललो, तर बामणाने मंत्र म्हटल्याप्रमाणे होईल, असंही त्यांनी म्हटलं. “माणूस चार अर्थाने बोलतो, पण हा एकच अर्थ काढतात. माझी अपेक्षा आहे की, मी गावरान माणूस आहे, दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस आहे. मी द्वीअर्थी बोलणारच ना. मी मुकं मुकं बोललो, तर बामणाने मंत्र म्हटल्याप्रमाणे होईल”, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Travel Guide | नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये फिरण्यासाठी ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाणं
- Kishori Pednekar । आरोपींसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगबाबत किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
- IND vs BAN : भारत-बांगलादेश सामन्यावर संकटाचे ‘ढग’ ; टीम इंडियाचा खेळ खराब करू शकतो पाऊस
- Tulshi Vivah 2022 | तुलसी विवाहासाठी कोणत्या गोष्टी आहेत आवश्यक?, जाणून घ्या
- Bachhu Kadu । “गरिबाच्या पोरीनं प्रेम केलं तर ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीनं केलं तर…”; बच्चू कडूंचा शरद पवारांना खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
