🕒 1 min read
IND vs BAN | भारत आणि बांगलादेशचा संघ बुधवारी अॅडलेड ओव्हल मैदानावर आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ हा सामना जिंकतील. मात्र यासाठी हा सामना होणे आवश्यक आहे. अॅडलेड ओव्हल मैदानावर होणाऱ्या सामण्यावर पावसाचे संकट आहे. अॅडलेडवर मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. तेथील थंडीही खूप वाढली आहे. त्यामुळे दोन्ही संघाला समान गुण मिळू शकतात.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, अॅडलेडचे तापमान १६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मात्र, ज्यावेळी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. त्या वेळी पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकतो. पावसामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पूर्णपणे पुढे ढकलला जाऊ शकतो. यामुळे भारताचा खेळ खराब होईल आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या आशांनाही धक्का लागू शकतो.
आकड्यांचा खेळ-
पावसामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना झाला नाही तर दोन्ही संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशांना धक्का लागू शकतो. गुणतालिकेत दोन्ही संघांची स्थिती पाहिली तर दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ दोन विजय आणि एक पराभवासह तीन सामन्यांतून चार गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचेही चार गुण आहेत पण नेट रन रेटमध्ये तो भारताच्या मागे आहे आणि त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर हा सामना पावसामुळे झाला नाही. तर दोन्ही संघांनी त्यांच्या पुढच्या सामन्यात जिंकले पाहिजे आणि नंतर रनरेट देखील उपांत्य फेरीत जाण्यासाठी मोठी भूमिका बजावू शकतो.
पाऊस आला तर काय होईल –
पावसामुळे हा सामना रद्द झाला तर भारताचे ५ गुण होतील. त्यामुळे भारताला झिम्बाब्वेविरुद्ध करा किंवा मरो असा सामना खेळावा लागणार आहे. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध विजय नोंदवला तर त्याचे ७ गुण होतील आणि उपांत्य फेरीत सहज प्रवेश होईल. पण झिम्बाब्वेविरुद्धचा सामना हरला तर पाकिस्तानची स्पर्धेत राहण्याची शक्यता वाढेल. पाकिस्तानने जर दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि त्यांचे ६ गुण असतील, तेव्हा ते उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात.
महत्वाच्या बातम्या :
- Tulshi Vivah 2022 | तुलसी विवाहासाठी कोणत्या गोष्टी आहेत आवश्यक?, जाणून घ्या
- Bachhu Kadu । “गरिबाच्या पोरीनं प्रेम केलं तर ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीनं केलं तर…”; बच्चू कडूंचा शरद पवारांना खोचक टोला
- Bachchu Kadu । “…तर मी सत्तेतून बाहेर पडणार आणि राजकारण सोडणार”; बच्चू कडूंच वक्तव्य
- Winter Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ तेल
- Bachhu Kadu । “पहिली वेळ आहे म्हणून माफ, यापुढे काही कराल तर…” ; बच्चू कडूंचा कुणाला इशारा?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
