🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: नोव्हेंबर (November) महिना फिरण्यासाठी (Travel) सर्वोत्तम आहे. कारण या महिन्यांमध्ये फिरण्यासाठी अनुकूल वातावरण (Weather) असते. नोव्हेंबर मध्ये तुम्ही ऐतिहासिक ठिकाणांपासून धार्मिक, ॲडव्हेंचर्स, ट्रेकिंग, नैसर्गिक इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकता. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यातील वातावरण समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्यासाठी देखील सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात जर तुम्ही कुठे फिरायला जायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात कुठे फिरायला जाता येईल याबद्दल माहिती सांगणार आहोत.
रन ऑफ कच्छ, गुजरात
नोव्हेंबरमध्ये भेट देण्यासाठी गुजरात मधील रन ऑफ कच्छ हे एक सर्वोत्तम ठिकाण ठरू शकते. कारण याच महिन्यांमध्ये कच्छ येथील जगप्रसिद्ध ‘रन ऑफ कच्छ’ उत्सव सुरू होतो. त्यामध्ये जगभरातील पर्यटक सामील होतात. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात तुम्ही जर कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर कच्छ हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.
शिलॉंग
नोव्हेंबर महिन्यातील अल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही शिलॉंगला जाण्याचा विचार करू शकता. कारण या वातावरणासाठी शिलाँग हे सर्वोत्तम ठिकाण आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला शिलाँगमध्ये अनेक सण उत्सव बघायला मिळतील ज्यामध्ये तुम्हाला तेथील संस्कृति दिसेल. त्याचबरोबर शिलॉंग मधील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी नोव्हेंबर महिन्यातील वातावरण हे अतिशय चांगले आहे.
उटी, तमिळनाडू
भारताच्या दक्षिण भागात तामिळनाडू राज्यामध्ये निलगिरी हिल्स मध्ये वसलेले उटी हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. उटीला ‘हिल्स ऑफ क्वीन’ असे देखील म्हणतात. उटीमध्ये असलेल्या पर्वतरांगेचा आनंद तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये घेऊ शकता. इथे तुम्हाला उंच उंच डोंगर, दूरवर पसरलेली हिरवीगार शेत, चहाची मळे इत्यादी गोष्टींचा आनंद घेता येईल.
पुष्कर, राजस्थान
नोव्हेंबर महिना हा पुष्कर शहराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो कारण पुष्कर मध्ये ‘जगप्रसिद्ध पुष्कर’ मेळावा हा याच महिन्यात आयोजित केला जातो. त्याचबरोबर या महिन्यात पुष्कर मध्ये उंट मेळावा देखील भरवला जातो. या कार्यक्रमांमध्ये सामील होऊन तुम्ही एक स्मरणीय अनुभव घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही या कार्यक्रमांमध्ये उंच सफारीचा आनंद घेऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Kishori Pednekar । आरोपींसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगबाबत किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
- IND vs BAN : भारत-बांगलादेश सामन्यावर संकटाचे ‘ढग’ ; टीम इंडियाचा खेळ खराब करू शकतो पाऊस
- Tulshi Vivah 2022 | तुलसी विवाहासाठी कोणत्या गोष्टी आहेत आवश्यक?, जाणून घ्या
- Bachhu Kadu । “गरिबाच्या पोरीनं प्रेम केलं तर ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीनं केलं तर…”; बच्चू कडूंचा शरद पवारांना खोचक टोला
- Bachchu Kadu । “…तर मी सत्तेतून बाहेर पडणार आणि राजकारण सोडणार”; बच्चू कडूंच वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
