🕒 1 min read
मुंबई: अभिनेता अल्लु अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंधना (Rashmika Mandhana) यांच्या पुष्पा (Pushpa) या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचा सक्सेस नंतर चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे. काल, रविवार पासून पुष्पा या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची शूटिंग सुरू झाले आहे. त्याचवेळी पुष्पा 2 च्या शूटिंग दरम्यान सेटवरून एक फोटो व्हायरल आला आहे. ज्यामध्ये अभिनेता अल्लू अर्जुन याचे लुक दिसत आहे. पुष्पा या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर मिरोस्ला कुबा ब्रोजेक यांनी अल्लू अर्जुन सोबतचा एक फोटो सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे. ज्यामध्ये पुष्पा 2 चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लुक दिसत आहे. चाहत्यांकडून या लुकला खूप पसंती मिळत आहे.
पुष्पा 2 (Pushpa 2) मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट झाला व्हायरल
पुष्पा चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर मिरोस्ला कुबा ब्रोजेक यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टच्या माध्यमातून अभिनेता अल्लू अर्जुन याचे पुष्पा 2 मधील फर्स्ट लूक व्हायरल झाले आहे. या पोस्टमध्ये अभिनेता “पुष्पा: द रुल” या चित्रपटातील एका दृश्यावर चर्चा करताना दिसत आहे. या चित्रपटाचे शूटिंग अनेक कारणांमुळे थांबले होते पण अखेर या चित्रपटाच्या शूटिंगला रविवारी सुरुवात झाली आहे.
Pushpa 2 | पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुन चे फर्स्ट लूक आले समोरhttps://t.co/5ai30XumFb
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 31, 2022
चित्रपटातील इतर कलाकार
पुष्पा 2 या चित्रपटांमध्ये अभिनेता अल्लू अर्जुन सोबत रश्मिका मांधना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये फहाद हसील देखील दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये समंथा प्रभू, अनुसया भरतवाज,सुनील, जगदीश भंडारी, विजय सेतूपती आदी कलाकार दिसणार आहेत.
“पुष्पा: द राईज” चित्रपटाने घातला होता बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ
“पुष्पा: द राईज” हा चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंधणा यांच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपट होता. या चित्रपटामुळे हे अभिनेते चाहत्यांच्या मनावर राज्य करत होते. हा चित्रपट डिसेंबर 2019 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने जवळजवळ 300 कोटींपेक्षा अधिक व्यावसाय केला होता. दरम्यान, ‘पुष्पा: द रूल’ या चित्रपटासाठी निर्मात्यांची जोरदार तयारी सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- NCP | “महाराष्ट्राचं नुकसान अन् गुजरातचं हित, एक दिवस मुंबईसुद्धा…”; राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
- Raj Thackeray | “जो प्रकल्प बाहेर पडतो तो गुजरातला जातो, मला वाटत पंतप्रधान…” ; राज ठाकरे यांचे विधान
- Ananya Pandey | अनन्या पांडेचा ‘पू’ अवतार बघून करीना कपूर झाली इम्प्रेस
- Sharad Pawar | मोठी बातमी! शरद पवारांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- Bacchu kadu | रवी राणा अन् बच्चू कडू यांच्या वादाचा अद्यापही अंत नाही? राणांच्या दिलगिरी नंतर सुद्धा बच्चू कडू म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
