Share

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या मिटिंगमधले ‘ते’ व्हिडीओ दाखवू का?, शिंदे गटातील नेत्याचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

Aditya Thackeray | मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बीड (Beed) जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांना अब्दुल सत्तारांनी “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला होता. त्यावरून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी . कृषी मंत्री दारू घेणार का? असं विचारतात यावरून काय ते समजा असं त्यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pawaskar) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

किरण पावसकरांचा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा 

आदित्य ठाकरे यांच्या मिटिंगवेळीही दारुच्या पार्ट्या व्हायच्या, असा गंभीर आरोप करतानाच या दारू पार्ट्यांच्या व्हिडिओ दाखवू का?, असा सवाल करत आदित्य ठाकरे यांना किरण पावसकर यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे. किरण पावसकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. तुम्हाला दारुच्या पार्ट्यांचे किती व्हिडिओ बघायचे आहेत? आदित्य ठाकरे यांच्या मिटिंग सुरू असताना दारु पार्ट्या व्हायच्या. या पार्ट्यांचे किती व्हिडिओ बघायचे आहेत? जर अशा पद्धतीने जाणार असाल. तर आम्हाला व्हिडीओ दाखवावे लागतील, असं पावसकरांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना पावसकर म्हणाले, काहीही झालं तरी मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. आता अब्दुल सत्तारांचा राजीनामा मागत आहेत. हे सत्तार तुमच्याकडे असताना शिवसेना भवनात पहिल्या रांगेत बसायचे. तेव्हा तुम्हाला आवडत होते. ही महत्त्वकांक्षा काय आहे? ही राक्षसी नाही? ही महत्त्वकांक्षा राक्षसी महत्त्वकांक्षांच्या पलिकडची आहे.

तसेच, कोरोना काळात काहींचे रोजगार गेले, मात्र काहींना त्याचा चांगला फायदा झाला. पैसे चांगले मिळाले. तीन महिने झाले सरकार येऊन काम तर करू द्या. अडिच वर्षात तुम्ही काय केलं ते आधी सांगा, असंही किरण पावसकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!