🕒 1 min read
Sushma Andhare | मुंबई : वेदांता पाठोमाठ नागपूरमध्ये (Nagpur) होणारा C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’(Tata Airbus Prroject) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. त्यामुळे आतार्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते सत्ताधारी नेत्यांवर टीका, टिपण्णींचा वर्षाव करत आहेत. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)
‘टाटा एअरबस’ हा महाराष्ट्राबाहेर जाणारा सातवा प्रकल्प आहे. ठरवून महाराष्ट्राचं अर्थकारण खिळखिळं केलं जात आहे. महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. मला वाईट याचं वाटतं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काहीही ठोस उपाय-योजना करत नसल्याचं असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर सातत्याने नवरात्रीची आरती करणे, गणपतीची आरती करणे, पितृपक्षाचं जेवण करणे, यालाच जर आपल्या कर्तव्याची चौकट मानत असतील, तर अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला असावं?, असा खोचक सवाल अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. पुढे बोलताना त्या असंही म्हणाल्या, सगळेच उद्योग जर तुम्ही गुजरातला देत असाल, तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा प्रभारी बनवा.किमान यामुळे तरी ते महाराष्ट्राकडे व्यवस्थित लक्ष देतील.
तसेच, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि कोकणातील सिंधुदुर्ग गोव्याला जोडण्याचा, जो अघोरी प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे, हे पूर्णत: आमच्या लक्षात येत आहे. आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं की, जे स्वत:ला महाराष्ट्राची अस्मिता जपणारे पक्ष म्हणवतात, ते पक्षही अळीमिळी चूपचिळी करून बसले आहेत. ते भाजपाची सुपारी घेऊन काम करत असल्याचंही अंधारे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rana-Kadu | राणा-कडू वाद गोड झाला?, वर्षावर झालेल्या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Shahajibapu Patil | ‘कसला मर्द’ म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना शहाजीबापू पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…
- Gujrat | धक्कादायक! गुजरातमध्ये पूल कोसळला, १२० जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता
- IND vs SA । केएल राहुल पुन्हा एकदा ठरला फ्लॉप, फॅन्सने सोशल मीडियावर केलं ट्रोल
- IND vs SA । दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 5 गडी राखून विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
