Share

Vinayak Raut | “यापुढे तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलं जाईल”; भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्यानंतर विनायक राऊत आक्रमक!

Published On: 

🕒 1 min read

Vinayak Raut | मुंबई : काल मध्यरात्री चिपळूण येथील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते भास्कर जाधव (BHaskar Jadhav) यांच्या घरावर आज्ञातांकडून घरावर दगड फेक करण्यात आली. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी या घडलेल्या सगळ्या प्रकारावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाले विनायक राऊत (Vinayak Raut)

शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर यापुढे तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलं जाईल, असं म्हणत विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी विरोधकांना सूचक इशाराच दिला आहे. विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.भास्कर जाधव हल्ले झेलण्यासाठी समर्थ आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ते गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांची लत्करे वेशीवर टांगल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचंही राऊतांनी सांगितलं आहे.

पुढे बोलतना विनायक राऊत म्हणाले की, नारायण राणे आणि भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांविषयीची राजकीय परिस्थिती मांडली म्हणून भास्कर जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही व्यक्तीस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याची पायमल्ली आहे. शिंदे सरकारकडून आमचे नेते, उपनेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशा पद्धतीने तोंड बंद करण्याचे प्रयत्न होत असेल, तर आम्ही घाबरणार नाही.

दरम्यान, भास्कर जाधव यांच्या घरावर दगड, स्टंम्प आणि बाटल्या फेकून आज्ञात पसार झाले आहेत.  ही दगडफेक कुणी केली हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेत तपास सुरू केला आहे. तसेच, पोलिसांनी त्यांच्या घराभोवती बंदोबस्त वाढवला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!