Share

Bhaskar Jadhav | “जे धनुष्यबाणाच्या नावाने मोठे झाले त्यांनीच हे चिन्ह गोठवण्याचं महापाप केलं”

Published On: 

Bhaskar Jadhav | मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच वातावरण गरम झालं आहे. एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गट या दोन गटांमधली आरोप-प्रत्यारोपांची खेळी दिवसेंदिवस चांगलीच रंगत चालली आहे. अशातच महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी(ED), सीबीआय (CBI), एनआयए(ANI), आयकर विभाग आदींकडून होत असलेल्या कारवायांवरून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटावर चांगलाच हल्ला केला आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)

आमचे विधीमंडळातील सहकारी वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस दिली. मात्र तिथले स्थानिक लोक सर्वकाही विसरून वैभव नाईकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. अशाचप्रकेर राजन विचारेंवर जो अन्याय होतोय, त्याला विरोधासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी खूप कल्पकतेने, संयमीपणे आणि नियोजबद्धरित्या शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं. परंतु सातत्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल समाजात शंका कुशंका पद्धतशीरपणे निर्माण करणं. विविध पातळीवर टीका, टिप्पणी आणि आरोप करणं, अशा पद्धतीचं काम सुरू होतं.

आपली धनुष्यबाण ही निशाणी गोठली, शिवसेना हे नावही गोठवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आपल्याला मशाल हे चिन्ह मिळालं. आपल्या शिवसेनेला सध्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालेलं आहे. उद्धव ठाकरेंना अनेकांनी शुभेच्छा दिल्या, तशाचप्रकारे एक सामान्य शिवसैनिक म्हणून मीही शुभेच्छा दिली. त्यांना सांगितलं, शिवसेना नाव गोठवण्याचा प्रयत्न झाला याचं दु:ख तर आहेच, शिवसेनाप्रमुखांच्या देवाऱ्यात असेलली धनुष्यबाण ही निशाणी, जे धनुष्यबाणाच्या नावाने मोठे झाले त्यांनीच गोठवण्याचं महापाप केलं. याचं दु:ख तर तुम्हाला आहेच. पण मला असं वाटतं नियतीने तुमच्यासाठी नवीन दार उघडलेलं आहे, की उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाने आता जे काही शिवसेनेचं बरं वाईट होईल. ते तुमचं असेल. यासाठी तुम्हाला नवीन संधी दिलेली आहे. नव्या शिवसेनेचा जन्म झालेला आहे. तुमच्या नेतृत्वात नवीन शिवसेना उभी करावी लागणार आहे.

शिवसैनिकांवा आवाहन करताना जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले की, आज ज्या पद्धतीने एखाद्याला तडीपारीच्या नोटीस दिल्या जात आहेत. कोणावर ईडी, सीबीआय, एनआयए, आयकर विभागाची कारवाई केली जात आहे. आमचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा काय दोष आहे. 50 कोटी एकेकाला तुम्ही दिलेत आणि 55 लाखांसाठी तुम्ही त्यांना तुरुंगात बसवलयं. त्यांनाही तुम्ही शिवसेना सोडा नाहीतर खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागेल, असं म्हटलं होतं. पण संजय राऊतांनी सांगितलं की मोडेन पण वाकणार नाही आणि शिवसेना व उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. म्हणून मला असं वाटतं की आपल्या सर्वांना पुन्हा एकदा त्यात हिंमतीने ताकदीने उभा रहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!