🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: आजकाल रात्री झोप न लागणे ही एक खूप सामान्य समस्या झाली आहे. पण चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप आवश्यक आहे. रोज किमान 7 ते 8 तास झोप शरीराला मिळाली पाहिजे. कारण झोप कमी झाल्यामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला कमी झोप झाल्यामुळे शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात याबद्दल माहिती सांगणार आहोत.
कमी झोप झाल्यावर शरीरावर होणारे परिणाम
इम्युनिटी पॉवर कमी होते
शरीराला पुरेशी झोप न मिळाल्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर कमी होऊ लागते. ज्यामुळे आपण जास्त आजारी पडू शकतो. कारण इम्युनिटी पॉवर कमी झाल्यास आपण रोगांशी लढण्यास पुरेसे सक्षम नसतो. त्यामुळे 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.
हृदयरोग होऊ शकतात
तुम्ही जर फक्त 5 ते 6 तास झोप घेतली तर ते तुमच्या हृदयासाठी अत्यंत हानिकारक आहे. आणि यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही जास्त असते.
मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागतात
पुरेशी झोप न मिळाल्यामुळे त्याचा सर्वात जास्त तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि तणाव देखील वाढतो. त्याचबरोबर आपली विचार क्षमता ही कमकुवत होते.
कॅन्सरचा धोका निर्माण होतो
कमी झोप झाल्यामुळे आपल्या शरीरात कॅन्सर सारखा गंभीर आजारही निर्माण होऊ शकतो. विशेषता रात्री झोप न घेतल्यामुळे प्रोटेक्ट कॅन्सर आणि कोलोरेक्टल कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे.
डायबिटीजचा त्रास होऊ लागतो
शरीराला मुबलक प्रमाणात झोप न मिळाल्यामुळे डायबिटीजचा त्रास होऊ लागतो. जर तुम्ही शरीराला 7 ते 8 झोप नाही दिली तर रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होऊ शकते.
वजन वाढू लागते
पुरेशी झोप न झाल्यामुळे आपल्याला लठ्ठपणाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कारण व्यवस्थित झोप न झाल्यामुळे वजन वेगाने वाढू लागते.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- Breaking News। नाशिकमध्ये अजून एक दुर्घटना; गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग
- Mobile Hack | तुमचा मोबाईल देखील वारंवार गरम होत असतो का?, मग ‘या’ टिप्स करा फाॅलो
- Jaidev Thackeray | जयदेव ठाकरे यांच्या मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठींबा ; ठाकरे पिता-पुत्रामध्ये मतभेद!
- Shivsena | धनुष्यबाण कोणाला? दिल्लीत वेगवान घडामोड, निवडणूक आयोगाची तातडीची बैठक
- Health Tips | ‘या’ नैसर्गिक गोष्टी वापरून मजबूत करा Immunity सिस्टीम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
