Share

Nashik Accident | झोपेत असलेल्या प्रवाशांवर काळाचा घाला! नाशिक येथे पहाटे बस आणि टँकरचा भीषण अपघात

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : नाशिक येथे अतिशय थरारक अशी घटना घडली आहे. प्रायव्हेट बसमधून प्रवास करणारे प्रवासी गाढ झोपेत असतानाच पहाटे काळाचा घाला आला. नाशिक येथील मिरची चौक येथे एका प्रायव्हेट लक्झरी बसचा टँकर सोबत भीषण अपघात झाला. अपघातानंतर काही क्षणातच या बसने पेट घेतला आणि क्षणात या बसची राख झाली. या घटनेनं संपुर्ण शहर हादरलं आहे.

नाशिक येथे बस आणि टँकरचा भीषण अपघात –

नाशिक येथील मिरची चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची प्रायव्हेट लक्झरी बस मिरची चौकात असताना टँकरसोबत धडकली. यानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातानंतर बसने पेट घेतला. यामध्ये १० प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी अनेक प्रवाश्यांनी खडकीतून उडी मारुन त्यांचा जीव वाचवला. तब्बल अर्धा तास या गाडीने पेट घेतला.

दरम्यान, ही घटना लोकांच्या निदर्शनास येताच खळबळ उडाली असून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या ३४ जणांवर उपचार सुरु आहेत.

नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया –

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी, नाशिक येथे टॅंकर आणि खाजगी बस यांचा भीषण अपघात झाल्याची घटना अतिशय वेदनादायी व दुःखद आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना विनम्र श्रद्धांजली. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत. ॐ शांती, असं म्हणत नितीन गडकरी यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया –

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद असल्याचं म्हटलं आहे. तसेच या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांना तातडीने आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या सहकारी आ. देवयानीताई फरांदे या सुद्धा रुग्णालयात असून समन्वय ठेवून आहेत, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!