Share

Ajit Pawar | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या राज्यातील राजकीय वातावरण खूपच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगलेली असते. अशातच गुरूवारी एका कार्यक्रमामध्ये भाजप पक्षाचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहाविकास आघाडीबाबत एक विधान केलं. त्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरू होते. हे जगजाहीर होतं. फक्त त्यांना यश मिळण्यासाठी अडीच वर्षं थांबावी लागली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी सत्तास्थापनेबद्दल सांगायची गरजच नव्हती, असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना चांगलंच फटकारलं आहे. अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी बोलत होते.

बारामतीला घेरणे इतके सोप्प नाही, इथे प्रत्येक जण आपल्या परीने काम करत असतो. शेवटी मतदार काय निर्णय घेतात त्यावर ते अवलंबून असते, त्यामुळे भाजपा नेत्यांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही, असं म्हणत निवडणूकीमध्ये बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव होणार, असं म्हणणाऱ्या नेत्यांनाही पवारांनी खडसावलं आहे.

दरम्यान,दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. गुरुवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकात पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!