Share

Eknath Shinde | मेळाव्यातील भाषणादरम्यान लोक उठून निघून गेल्याच्या व्हायरल व्हिडीओवर एकनाथ शिंदे म्हणतात…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बुधवारी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. मात्र यावर्षी शिवसेनेचे दोन मेळावे पाहायला मिळाले एक एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावरचा आणि दुसरा उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील. दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. तसेच शिंदे गटाच्या मेळाव्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना लोक उठून जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे यावरून विरोधकांनी शिंदे गटावर खूप टीका, टीपण्णी केल्या आहेत. अशातच या व्हायरल व्हिडीओवर स्वत: एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

कोणी ते व्हिडीओ व्हायरल केले. ते जाऊ द्या. पण शेवटी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं. बीकेसीमध्ये किती लोक आले होते? का आले होते? जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर एवढी लोकं समर्थनाला आली असती का?, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत भाष्य केलं आहे. शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर दोन लाखांहून अधिक लोक जमली होती, असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच, आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे वंदनीय आहेत. आम्ही त्यांना आमचं दैवतच मानतो. कोणी कितीही काही म्हटलं तरी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. याच कारणामुळे राज्याबरोबरच देशभरातील लोक आम्हाला सोबत करत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बीकेसी मैदानावरी मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने ठाकरे कुटुंबाबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केलं होतं. रात्री साडेआठच्या आसपास मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि ते दहा वाजेपर्यंत ते बोलत होते. त्यामुळे शिंदेंच्या लांबलेल्या भाषणामुळे बीकेसी मैदानावरील लोक कंटाळून निघून जात असल्याचं पाहायला मिळालं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!