🕒 1 min read
मुंबई : गोरेगाव भागातील नेस्को संकुल येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावना गवळी यांनी राखी बांधली या प्रसंगावरून टोला लगावला. यावर प्रतिक्रिया देत असताना शिंदे गटातील खासदार भावना गवळी भावूक झाल्या असून उद्धव ठाकरेंना त्यांनी उत्तर दिलं आहे.
भावना गवळी यांचं उत्तरः
काल मी त्यांची ताई होते, आज बाई झाले, रक्षाबंधन सारख्या पवित्र नात्याचं कुणीही राजकारण करू नये असं भावना गवळी यांनी व्यक्त केलं आहे. मी मागील अनेक वर्षांपासून माझ्या मतदारसंघातील एक लाख पेक्षा जास्त बांधवांना राख्या पाठवल्या आहेत, याआधीही मी अनेक मंत्र्यांना, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देखील राखी बांधली असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला वाईट काळामध्ये मदत केली म्हणून मी त्यांची साथ दिली, उद्धव साहेब नैराश्यातून अशी विधानं करत आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या.
उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना सवालः
मला पंतप्रधानांचे आश्चर्य वाटतं स्वतःच्याच पक्षातील माणसांनी ज्या महिला खासदारावर आरोप केले, तुम्हाला या सव्वा दीडशे कोटी लोकसंख्येमध्ये हीच एक बहीण मिळाली का राखी बांधायला?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केला होता.
दरम्यान, भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर निदान खरं खोटं काय ते बघून घ्या, भाजपने काय माणसं धुवायची लॉन्ड्री काढली आहे का? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केला होता. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर देखील सडकून टीका केली होती. याला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane : उद्धव जगातला सर्वात ‘ढ’ माणूस; नारायण राणेंची संतप्त टीका
- मुलगा आर्यन खान च्या अटकेवर आई गौरी खानने प्रथमच तोडले मौन, म्हणाली “यापेक्षा वाईट काही नाही…”
- Anil Parab | शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होईल, कारण…; अनिल परबांचं मोठं वक्तव्य
- Chandrashekhar Bawankule | आजही उद्धव ठाकरे सुधारलेले नाहीत ; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
- Russia | पुतीन यांच्या घोषणेनं दहशत! नागरीकांची देश सोडण्याची गडबड तर फ्लाईट्स देखील बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
