🕒 1 min read
नवी दिल्ली : रोहित शर्मा मैदानावर आणि मैदानाबाहेर चांगला वागणारा माणूस आहे. तो सकारात्मकतेने मैदानात उतरण्याचा प्रयत्न करतो. कर्णधार झाल्यानंतर टीम इंडियाला यशही चांगलेच मिळाले आहे. दरम्यान, त्याने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्यासोबतच्या YouTube शोमध्ये शमीबद्दल, रोहित शर्मा म्हणाला की आमच्याकडे नेट सरावासाठी असलेल्या खेळपट्ट्या नेहमीच ओलाव्याने हिरव्या असतात. जेव्हा मोहम्मद शमी हिरवीगार खेळपट्टी पाहतो तेव्हा तो जास्त बिर्याणी खाऊन येतो.
बुमराह आणि शमी यांच्यात स्पर्धा-
रोहित शर्माने बुमराह आणि शमी यांच्यातील स्पर्धेबद्दल सांगितले. तो म्हणाला की बुमराहही कठीण आहे. मी 2013 पासून खेळत आहे. पण हो सध्या बुमराह आणि शमी यांच्यात स्पर्धा सुरू आहे की कोण सर्वाधिक बीट करतो, कोण हेल्मेटवर सर्वाधिक हिट करु शकतो.
रोहित शर्मा याने कर्णधारपदाची छाप पाडली-
झिम्बाब्वेतील एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेला रोहित शर्मा या महिन्याच्या अखेरीस संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी संघाचे नेतृत्व करण्यासाठी परतणार आहे. पूर्णवेळ नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्याने आपल्या कर्णधारपदाची छाप पाडली आहे.
दोन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम-
रोहित शर्माने सलामीवीर म्हणून टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून त्याच्यावर दुहेरी जबाबदारी आहे. तो दोन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Shirsat | ‘त्या’ ट्वीटवर संजय शिरसाट यांचे स्पष्टीकरण! म्हणाले, “मला मंत्रिपदाबाबत…”
- Sanjay Shirsat | उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्वीट करत संजय शिरसाट यांचा एकनाथ शिंदेंना इशारा!
- Salman Rushdie stabbed : लेखक सलमान रश्दी यांच्यावर भर कार्यक्रमात जिवघेणा चाकू हल्ला, हल्लेखोरांना अटक!
- Pankaja Munde to Akshay Kumar | पंकजा मुंडेंचे ‘ते’ एक ट्वीट अण् आला अक्षय कुमारचा रिप्लाय ! जाणून घ्या प्रकरण…
- Ambadas danve | गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मविआने एकत्र येण्याची गरज – अंबादास दानवे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

