Share

पंतप्रधान मोदींच्या आईने गाठली वयाची ‘शंभरी’; निवासस्थानी जाऊन घेतली भेट

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी आज वयाची शंभरी गाठली आहे. यानिमित्तानेच नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी भेट देत आईची भेट घेतली आहे. आईचे चरणस्पर्श करत मोदींनी आईचे आशीर्वादही घेतले.

दरम्यान केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ८ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकारला ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र भाजप विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष रोजच पहावयास मिळत असतो. दरम्यान येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी भाजप तसेच विरोधी पक्षाकडून तयारी सुरु असल्याचे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान आहेत अशी जनतेची धारणा होऊ लागली आहे. अनेक मोठ्या योजना आणि धोरणे आणण्याचा उत्साह केंद्र सरकार दाखवत असले तरी प्रत्यक्षात ठोस कृतिशील आखणी नसल्याने अनेकदा या योजनांमध्ये बदल करावे लागले तर अनेक योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्वीटरवर पोस्ट करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!