🕒 1 min read
मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. आगामी विधानपरिषेदेची निवडणूक येत्या २० जूनला होणार आहेत. सर्व आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केले आहेत.
संजय राऊत यांनी आमदारांना थेट बंदूक दाखवूनच धमकी दिली असल्याचे, खळबळजनक दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेचे आमदार फुटल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देत पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “आमचे आमदार फुटलेले नाहीत, तुमचं नशीब फुटलयं ते बघा.”
मात्र किरीट सोमय्यांनी याबाबत संजय राऊतांनर आरोप केले आहेत. आपल्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेेने महाराष्ट्रातील आमदारांवर मोठा दबाव आणल्याचं सोमय्या म्हणाले. इतकच नाही तर संजय राऊत यांनी थेट आमदारांना बंदूक दाखवून धमकीच दिली असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. याबाबत तक्रारही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
दरम्यान, शिवसेनेनं राज्यसभेची ही निवडणूक भ्रष्ट केली असल्याचा आरोपही, किरीट सोमय्यांनी यावेळी केला. सोमयांच्या या आरोपांवर निवडणूक आयोग काय भुमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
