मुंबई : देशभरात कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने वाढायला लागली आहे. कोरोना पुन्हा एकदा डोक वर काढू लागला आहे. देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा धडकी बसवणारा आहे. कोरोना रुग्णांची संख्या मुंबई शहरामध्ये जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या ५,२४,७५७ वर पोहचली आहे. तर देशामध्ये एका दिवसात ८३२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
ज्या वेगाने कोरोनाची रूपे बदलली आहेत, त्याच वेगाने कोरोनाची लक्षणेही बदलली आहेत. कोरोनाच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, सर्दी किंवा श्वासोच्छवासाचा त्रास यांचा समावेश होतो, पण आता लोकांना काही वेगळी लक्षणे दिसू लागली आहेत. ही लक्षणे काही दिवस किंवा आठवडे नाहीतर वर्षभर टिकू शकतात. अशी माहिती समोर येत आहे.
कोरोना हा श्वसनाचा आजार आहे पण त्याची लक्षणे फुफुसांवर जास्त परिणाम करतात. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांना अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तज्ञांच्या मते, जास्त काळ टिकणाऱ्या लक्षणांना लॉंग कोविड म्हणतात.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
