Share

“…तर भाजप आणि तपास यंत्रणांचा पराभव निश्चित होता”, व्हिडिओ पोस्ट करत सचिन सावंत यांची टीका

Published On: 

मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे  संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. यावरच काँग्रेस प्रवक्ते यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेता अमीर खानच्या चित्रपटातील सायकलिंगचा एक सीन दाखवण्यात आला आहे. ज्यात अमीर खानसमोर सायकल चालवताना अनेक अडथळे निर्माण केली जात आहे. यालाच भाजप तसेच एजेन्सी आणि मविआ सरकारची परिस्थिती म्हणून उपमा देण्यात आली आहे. यावेळी सचिन सावंत यांनी म्हटले की, “अपक्षांचे सोडा पण नवाब मलिक, अनिल देशमुख यांना मतदान करायला मिळाले असते आणि सुहास कांदे यांचे मतदान बाद झाले नसते तर भाजपा आणि तपास यंत्रणांचा पराभव निश्चित होता… हेच सत्य आहे. असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्यसभेच्या निकालानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, “भाजपने नक्कीच जागा जिंकली, पण त्यांचा विजय झाला असे मी समजत नाही. पहिल्या पसंतीची ३३ मतं संजय पवार यांना मिळाली, तर धनंजय महाडिक यांचा दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर विजय झाला. त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांचा हिशोब झाला असता तर आम्ही जवळपास जिंकलो होतो.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!