Share

IPL 2022 CSK vs GT : धोनीनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022)मधील ६२ वा सामाना रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात खेळला जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  हा सामाना दुपारी साडे तीन वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होईल. प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केल्यानंतर आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणारी गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवून अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. यंदाच्या हंगामात नव्याने समावेश झालेल्या गुजरातने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आणि दोन सामने शिल्लक असताना प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. गुजरातने १२ सामन्यांत ९ विजय मिळवून १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे. चेन्नईविरुध्दचा सामाना जिंकल्यास अव्वल दोनमध्ये स्थान निश्चितच होईल, म्हणजे संघाला अंतिम फेरीत जाण्याची अतिरिक्त संधी मिळेल.

हेड टू हेड आकडेवारी
या दोन्ही संघामध्ये एकच सामना खेळला गेला आहे. हा सामाना १७ एप्रिलला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियमवर खेळवला गेला होता. यामध्ये गुजरातने विजय मिळवला होता. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या अनुपस्थित राशिद खानने कर्णधारपद भूषविले होते.

चेन्नई सुपर किंग्स – एम.एस धोनी (कर्णधार), मोईन अली, रुतुराज गायकवाड़, मिशेल सेंटनर, डेवोन कॉनवे, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, एन जगदीशन, एम पथीरणा  प्रशांत सोलंकी आणि  मुकेश चौधरी।

गुजरात टाइटन्स – हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, शुबमन गिल, राहुल तेवतिया, मैथ्यू वेड, रिद्धिमान साहा, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, आणि यश दयाल।

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!