🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (३ मार्च) पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचा निषेध म्हणून राज्यपाल अभिभाषणवेळी मविआ नेत्यांनी प्रचंड गोंधळ घालत घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण पटलावर ठेवत भाषण न करताच ते निघून गेले. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टीका केली आहे.
“महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे अभिभाषण पूर्ण न वाचता संयुक्त सभागृहातून निघून गेले. विरोधकांनी घातलेल्या गदारोळातच राज्यपालांनी अभिभाषणातला तिसरा मुद्दा न वाचताच काढता पाय घेतला. या तिसर्या मुद्द्यात महाराष्ट्र सरकारने कर्नाटक राज्यात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आणि बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना याबाबत निषेध व्यक्त केला होता. हा मुद्दा न वाचताच राज्यपालांनी भाषण आटोपते”, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी राज्याचे राज्यपाल मा. भगत सिंह कोश्यारी हे अभिभाषण पूर्ण न वाचता संयुक्त सभागृहातून निघून गेले. विरोधकांनी घातलेल्या गदारोळातच राज्यपालांनी अभिभाषणातला तिसरा मुद्दा न वाचताच काढता पाय घेतला.#BudgetSession2022 pic.twitter.com/NBvzk3fheU
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 3, 2022
तसेच काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान केला होता. त्यामुळे राज्यपालपदावर राहण्याचा त्यांना कुठलाही नैतिक अधिकार राहत नाही. राज्यपालांच्या अभिभाषणातील तिसरा मुद्दा भाजपच्या अंगलट येत होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या सांगण्यावरून भाजपचे समर्थक असलेले राज्यपाल तिसऱ्या मुद्द्याचे वाचन न करता निघाले. असा आरोपही मिटकरी यांनी केला आहे.
त्यामुळे “कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी आज मविआ सरकार त्यांना जाब विचारणार होती. मात्र ऐन वेळी त्यांनी पळ काढला ही लाजिरवाणी बाब असून महाविकास आघाडी सरकारमधील घटक या नात्याने राज्यपालांना माझी विनंती आहे की, नैतिकता शिल्लक असेल आणि देशाबद्दल आस्था असेल तर आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा”, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- कोण आहे अनन्या पांडेचा बॉयफ्रेंड? हातवारे करत घेतले ‘या’ अभिनेत्याची नाव
- OBC Reservation : आघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटले- प्रसाद लाड
- “महाराष्ट्राची भूमिका राज्यपालांनी घ्यायला पाहीजे होती, पण…”; रोहित पवारांचा खोचक सवाल
- “राज्यपालांना महाराष्ट्राचे महापुरुष नकोयत, अर्थसंकल्पात त्यांचं भाषण नकोय”, धनंजय मुंडेंची टीका
- “ओबीसी समाजाची ही थट्टा”, सुप्रीम कोर्टाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
