मुंबई: भारतीय संघाच्या यष्टीरक्षक रिद्धिमान साहाने एकामागून एक खुलासे करून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. साहाने अलीकडेच एका पत्रकारावर मुलाखतीसाठी छळ केल्याचा आरोप केला होता. त्या मुद्द्यावर आता बीसीसीआय कठोर निर्णय घेत या प्रकरणाची चौकशी करणार असलयाचे समोर येत आहे. साहाने सोशल मीडियावर मुलाखतीसाठी धमकी देणाऱ्या पत्रकाराच्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता.
रिद्धिमान साहाच्या या आरोपांनंतर आता बीसीसीआय कारवाईत आली आहे. बीसीसीआयने याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेणार आहे. बोर्ड या प्रकरणाची सखोल चौकशी करेल. साहा हा अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांचा बोर्डाशी करार आहे. अशा परिस्थितीत बोर्ड आपल्या खेळाडूंना एकटे सोडू शकत नाही. रिद्धिमान साहाला पत्रकाराचे नाव देखील बोर्डाने विचारले आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड हे हलक्यात घेणार नाहीये. साहाने मुलाखतीत जे काही सांगितले आणि त्यानंतर त्यांनी काय ट्विट केले. बोर्ड त्याच्या तळाशी जाणार आहे. बीसीसीआय आपल्या तपासात हे देखील शोधेल की यापूर्वीही कोणत्याही क्रिकेटपटूला अशा समस्यांचा सामना करावा लागला आहे का. तसेच कोणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताच्या १६ वर्षीय ग्रँडमास्टर प्रग्नानंधाकडून वर्ल्ड नं १ कार्लसन पराभूत
- वाढदिवसासाठी सुट्टीवर येणार होता, पण त्याआधीच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना आले वीरमरण
- “…तर माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचारा”, राऊतांच्या ‘भ***’ वक्तव्यावर सोमय्या संतापले
- चारा घोटाळा : लालू यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, सात लाखांचा दंड
- वेस्ट इंडिजला पराभूत करताच भारतीय संघ बनला “वर्ल्ड नं. १”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
