🕒 1 min read
मुंबई: बिग बॉसमधून अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर अभिजीतने सलमान खानला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. आता त्याने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत थेट कोथळा बाहेर काढण्याची धमकी सलमान खानला दिली आहे.
“सलमान खान बॉलीवूडमध्ये उन्माद माजवतोय असा आरोप करत सलमान खान अफझल खान (Salman Khan is Afzal Khan) तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस (I am the the ideological heir of Chhatrapati Shivaji Maharaj statement of Abhijit Bichukle) आहे त्यामुळे पेनाने कोथळा बाहेर काढेल”, असा इशारा बिग-बॉस फेम अभिजित बिचुकलेने दिला आहे.
तसेच सलमान खानला ‘खान’ नावाचे घमंड असून तो अफझल खान आहे. आणि मी शिवरायांचा वैचारिक वारस असून तसेच शाहू फुले आंबेडकरांना मी मानणारा आहे. त्यामुळे माझे शस्त्र पेन असून पेनाने सलमानचा कोथळा बाहेर काढू असे म्हटले आहे. तसेच माझ्यामुळे बिग-बॉस कार्यक्रमाला रॉकेट स्पीड मिळाली. असेही अभिजित बिचुकलेने म्हटले आहे. याअगोदर त्याने सलमानसारखे १०० जण मी दाराशी उभे करीन आणि गल्ली झाडायला लावीन असेही म्हटले होते. यावरूनही बराच वाद रंगला होता. आता त्याने सलमानला थेट कोथळा बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “अमृता फडणवीसांना वर्षा बंगला सोडावा लागल्यामुळे त्या फ्रस्टेशनमध्ये”, मनीषा कायंदेंची टीका
- औंरगाबादेत बॅनर लावून बायको पाहिजे म्हणणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल
- “अशोक गर्ग MAGPIE ग्रुपने संजय राऊत कुटुंबाला भागीदारी दिली?”, किरीट सोमय्य्यांचा सवाल
- “शेतकऱ्यांना आता गांजा पिकवण्याची देखील परवानगी द्यावी”, भाजप खासदाराचा संताप
- ३१ जानेवारी ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा करणार-राकेश टिकैत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
