🕒 1 min read
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काल शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना ठाण्यातून ताब्यात घेतले असून, चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं.
या घडामोडींवरून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आमदार प्रताप सरनाईक काल दिवसभर कुठे होते यावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले होते. यानंतर त्यांनी संध्याकाळी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. सुमारे दीड तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
आता, प्रताप सरनाईक यांना ईडी कार्यालयाने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सरनाईक आज सकाळी ११ कार्यालयात हजर राहणार असल्याचं वृत्त न्यूज १८ लोकमतने दिलं आहे. तर, हे प्रकरण राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. सरनाईक यांचा काही घोटाळा नसल्यास त्यांनी कारवाईला सामोरं जावं सत्य बाहेर येईल असं आव्हान भाजप नेत्यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर केंद्र सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकते’; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
- ‘आता मी आलोय साहेब, येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे’; राष्ट्रवादीत परतल्यानंतर गायकवाडांची गर्जना
- ‘दानवे खासदार असल्याचं माहित आहे पण त्यांना ज्योतिषशास्त्र देखील कळतं याची कल्पना नव्हती’
- प्रताप सरनाईक यांच्यावर जो इडीचा छापा पडला त्यात भाजपचा कोणताही हात नाही : पाटील
- लस कधी येणार हे सांगू शकत नाही, पण ती सर्वांना उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी

