Share

संग्राम जगताप यांची खेळी यशस्वी; मनोज कोतकर स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून तयारी सुरू असतानाच काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपला जोरदार धक्का दिला. मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच काल मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. भाजपमधून राष्ट्रवादीत जात स्थायी समिती सभापतीपदाची उमेदवारी मिळविणारे मनोज कोतकर हे महाविकास आघाडीचेच उमेदवार असल्याचे शिवसेना नेत्यांनी मान्य करत अखेर शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.

भाजपकडून सभापती पदासाठी इच्छूक असलेले पण राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी काल राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर लगेच सभापतीपदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शिवसेनेनेही योगीराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु शिवसेनेकडून संख्याबळ जुळत नसल्यामुळे अखेर शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे समितीच्या सभापतीपदी कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.

शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने ही खेळी केली होती. राष्ट्रवादीने टाकलेल्या जाळ्यात शिवसेना अडकली. राष्ट्रवादीत गेलेले कोतकर भाजपचेच आहेत, असे सांगणारे स्थानिक शिवसेना नेत्यांनाही श्रेष्ठींपुढे नमते घ्यावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थायी समिती सभापतिपदासाठीचा अर्ज मागे घेत असल्याचे योगीराज गाडे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!