Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विनायक बगदुरे यांची वर्णी लागणार ?

Published On: 

🕒 1 min read

निलंगा (प्रदीप मुरमे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील यांची महाराष्ट्र महामंडळावर अध्यक्ष म्हणून निवड करावी व लातूर जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पूर्णवेळ पक्षाचे काम करणा-या कार्यकर्त्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्याची मागणी शरद पवार विचार मंच निलंगा तालुका शाखेच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना करण्यात आली.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुधीर मसलगे,अंगद जाधव,धम्मानंद काळे,संदीप मोरे,गणीमामू खडके,किरण सोळुंके यांचा समावेश असलेल्या शरद पवार विचार मंचच्या या शिष्टमंडळाने बुधवारी दस्तूरखुद्द शरद पवार यांची भेट घेवून या मागणीचे निवेदन दिले.विद्यमान जिल्हाध्यक्ष अहमदपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यामुळे त्यांची महामंडळावर अध्यक्ष म्हणून निवड करण्याची मागणी करण्यात आली.त्याचबरोबर जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी जिल्हाध्यक्षपदी विनायक बगदुरे,बबनदादा भोसले,अफसर शेख,बापूसाहेब पाटील,नरेंद्र पाटील यांच्यापैकी एकाची निवड करण्याची मागणी या शिष्टमंडळाच्यावतीने शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांना करण्यात आली आहे.

या विषयाबाबत खा.शरद पवार यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे सुधीर मसलगे यांनी सांगितले.जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आमदार झाल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पूर्णवेळ देणाऱ्या कार्यकर्त्यावर जिल्हाध्यक्षपदाची धूरा सोपविण्यात येणार असल्याचे समजते.त्यामुळे जिल्हाध्यक्ष या महत्वाच्या पदासाठी पक्षाध्यक्ष पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते विनायक बगदुरे यांच्या नावाची जोरदार चर्चा मागील काही दिवसापासून निलंगा विधानसभा मतदारसंघातून ऐकावयास येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची धूरा ते यशस्वीपणे पार पाडत आहेत.मराठा सेवा संघ या बहूजन संघटनेच्या चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेलं नेतृत्व म्हणजे विनायक बगदुरे होय.अभियंता या पदाच्या लठ्ठ पगाराच्या शासकीय सेवेचा राजीनामा देवून समाजकारण व राजकारणात उडी घेतलेले बगदुरे सातत्याने ग्रामीण भागातील जनतेच्या संपर्कात असतात.

शरद पवार यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा हा कार्यकर्ता पायाला भिंगरी लावून सातत्याने या मतदारसंघात फिरत असतो.त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करावयाचे असल्यास पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या विनायक बगदुरे यांची निवड केल्यास पक्षाला फायदा होणार आहे.त्यामुळे शरद पवार विचार मंचची मागणी लक्षात घेता विनायक बगदुरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागणार अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून ऐकावयास येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!