Share

Raju Shetti | शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेंवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; राजू शेट्टी म्हणाले, “तालिबान्यांसारखे…”

Published On: 

🕒 1 min read

Raju Shetti | मुंबई : महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेबब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी गेल्या दोन- तीन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथे केलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपल्या वक्तव्यावरून दिलगीरी देखील व्यक्त केली. परंतु, काल पिंपरी-चिंचवड येथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.

शाईफेक करणाऱ्या ( Throwing Lnk) तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी  (Police Custody) सुनावली आहे. शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले, “शाईफेकीचे समर्थन करणे चुकीचे आहे, पण शाई फेकणाऱ्या युवकावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाहता सरकार तालिबानींसारखे वागू लागले आहे असे वाटते. ३०७ म्हणजे धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न आणि ३५३ म्हणजे सरकारी कामात अडथळा याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणे हे सरकारी काम आहे का?”

“मग हा कायदा दिल्लीतील शेतकरी आंदोलनात ज्या सरकारने ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेतला त्याला जबाबदार असणाऱ्यांवर ३०२ सह ही कलमे का लावण्यात आले नाहीत?” असा प्रश्न राजू शेट्टींनी विचारला. पुढे ते म्हणाले, “शाई ही पेनातच धारदार असते दौतामध्ये नाही. असे आम्ही समजत होतो पण दौतातील शाईसुध्दा धारदार शस्र्त्रासारखे काम करते याचा शोध लावल्याबद्दल संबंधित तपास अधिका-याला रेमेन मॅगेसस पुरस्काराने सन्मानित करण्याची गरज आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!