🕒 1 min read
Nana Patole | मुंबई : भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे. चंद्रकांत पाटील पैठणमधील एका कार्यक्रमात बोलते होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पाटील म्हणाले, “मी महापुरुषांबद्दल आदरच व्यक्त केला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरु केल्या, मात्र यासाठी त्यांनी भिक मागितली असे माझे विधान होते. आता भिक म्हणजे आजच्या काळातील सीएसआर फंड किंवा त्याला आपण देणगी म्हणू शकतो.” यावर “चंद्रकांत पाटील यांना भीक, लोकवर्गणी व देणगी यातील फरक तर कळतो का?”, असा संतप्त सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, “महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा सुरु करुन शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी या महापुरुषांनी आपल्याकडे जे होते ते सर्वस्व दिले.”
लोकांकडून वर्गणी, देणगीच्या स्वरुपात पैसे जमा केले व शाळा उघडल्या. लोकसहभातून शैक्षणिक संस्थांचा विस्तार गावखेड्यात केला. ह्या महान कार्यासाठी त्यांनी ‘भीक’ मागितली असे म्हणून चंद्रकात पाटील यांनी या महापुरुषांचा, त्यांनी केलेल्या महान कार्याचाच अपमान केला असे नाही तर बहुजन समाजाचाही अपमान केला असल्याचं नाना पटोले म्हणालेत.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर भाजपाच्या एकाही नेत्यांने अजून माफी मागितली नसताना भाजपाचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्राकात पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करुन आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केलीय.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Patil | महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “शेंडा नाही…”
- Amol Mitkari | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याचा अमोल मिटकरींकडून समाचार; म्हणाले,
- Devendra Fadnavis | मराठवाड्यालाच नव्हे उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणार समृध्दी महामार्ग – देवेंद्र फडणवीस
- Chandrakant Patil | “फुले-आंबेडकर, कर्मवीर यांनी शाळांसाठी भीक मागितली”; चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधान
- Balasaheb Thorat | भारतीय जनता पक्षाकडे देशाच्या हिताचं तत्त्वज्ञान व कार्यप्रणाली नाही – बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
