🕒 1 min read
Amol Mitkari | मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली असून विविध स्तरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. यावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना चांगलेच सुनावले आहे. भाजप नेत्यांच्या मस्तकातील घाण काढण्यासाठी गाडगे बाबांचा झाडू हाती घ्यावा लागेल. सतत महामानवांचा अपमान केला जात आहे. असेही अमोल मिटकरी यांनी म्हंटले आहे.
महापुरुषांनी लोकवर्गणीतून आणि स्वतःच्या पैशातून शाळा सुरू केल्या आहेत, त्याला भीक नाही म्हणत, असं अमोल मिटकरी म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. चंद्रकांत पाटालांनी मंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांकडे भिक मागितली, तशी महामानवांनी शाळा सुरू करण्यासाठी भिक मागितली नाही, असा टोला मिटकरी (Amol Mitkari) यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
भाजपमधील आणखी एका वाचाळविराने मुक्ताफळे उधळली.कर्मवीर भाऊराव पाटील, म.फुले , बाबासाहेबानी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली, असे विधान करुन महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व महापुरुषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलाचा जाहीर निषेध. pic.twitter.com/ERp4XZy2lu
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 9, 2022
“भाजपमधील आणखी एका वाचाळविराने मुक्ताफळे उधळली.कर्मवीर भाऊराव पाटील, म.फुले , बाबासाहेबानी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली, असे विधान करुन महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व महापुरुषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलाचा जाहीर निषेध”, अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
“सरकारवर अवलंबून का राहताय? या देशात शाळा सुरु कुणी केल्या, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरु केल्या. महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केली मला पैसे द्या, आता त्या काळी १० रुपये देणारे होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत ना?”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | मराठवाड्यालाच नव्हे उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणार समृध्दी महामार्ग – देवेंद्र फडणवीस
- Chandrakant Patil | “फुले-आंबेडकर, कर्मवीर यांनी शाळांसाठी भीक मागितली”; चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधान
- Balasaheb Thorat | भारतीय जनता पक्षाकडे देशाच्या हिताचं तत्त्वज्ञान व कार्यप्रणाली नाही – बाळासाहेब थोरात
- Shraddha Walker Father | … तर माझी मुलगी आज जिवंत असती – श्रध्दा वालकरच्या वडिलांची प्रतिक्रिया
- Vasant More | “स्मशानभूमीत येईन, पण मनसेच्या शहर कार्यालयात जाणार नाही”; वसंत मोरे असं का म्हणाले?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
