Share

Chandrakant Patil | महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “शेंडा नाही…”

Published On: 

🕒 1 min read

Chandrakant Patil | औरंगाबाद : भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली असून विविध स्तरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पाटील म्हणाले, “मी महापुरुषांबद्दल आदरच व्यक्त केला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरु केल्या, मात्र यासाठी त्यांनी भिक मागितली असे माझे विधान होते. आता भिक म्हणजे आजच्या काळातील सीएसआर फंड किंवा त्याला आपण देणगी म्हणू शकतो.”

माझ्या वक्तव्याचं वारकऱ्यांनी स्वागत केले असेही पाटील म्हणाले. आता प्रत्येक गोष्टीला शेंडा नाही, बोडका नाही म्हणून त्यावर वाद निर्माण करण्याचे जे चाललं आहे, त्याचा जे कोणी ही क्लिप ऐकली तर ते देखील म्हणतील हि यांचं काय चाललं आहे, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

दरम्यान, यावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना चांगलेच सुनावले आहे. भाजप नेत्यांच्या मस्तकातील घाण काढण्यासाठी गाडगे बाबांचा झाडू हाती घ्यावा लागेल. सतत महामानवांचा अपमान केला जात आहे. असेही अमोल मिटकरी यांनी म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!